
मित्रांनो अजुन दोन कविता लिहित आहे. तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर नक्की reply करा.

--एकटेपण--
प्रिये आज कस् एकट एकट वाटतय
तुझी आठवण येताच मनात अंधार दाटतय
तुझ्या विरहाने हे जीवन आता मला काटतय
दरदिवशी एकटेपणाने हृदय माझ फाटतय
आता हा एकटेपणा मला चावतोय
म्हणुन तर तुझ्या शोधात मी आता धावतोय
तुझा प्रेमरूपी सुगंध मला भावतोय
म्हणुन मी आपल्या प्रेमाचे गुपित सर्वाना दावतोय
तुझ्याविना आहे मी एकटा पडलो
तुझ्या विरहात खुप खुप रडलो
तुझ्यासाठी मी दुनियेशी झगड़लो
आयुष्यात माझ्या बर्याचवेळा धडपडलो
आता हा एकटेपणा मला हलू हलू गीळतोय
रात्रि स्वप्नात येवून मला छळतोय
दिवस रात्र मला पिळतोय
म्हणुन या एकटेपणापासून मी दूर पळतोय
एकटेपणा माझा तुला कधी कळणार
कळल्यावर तुझे मन मात्र झुरणार
तुझ्या डोळ्यात अश्रु ढळणार
आणि तू स्वतःपासून लाम्ब पळणार
--स्क्रैप चे लिमिटेशन असल्यामुळे कविता येथेच संपवत आहे.
ही कविता लिहायला मला तब्बल चार दिवस लागले.
कविता आवडली तर नक्की कळवा
Thursday, August 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment